Chief Secretary : बंगाल निवडणुकीपूर्वी मुख्य सचिव-DGP हटवले; कोलकाता पोलिस आयुक्तांसह 6 अधिकारी बदलले
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतरच, निवडणूक आयोगाने सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयोगाने पीयूष पांडे यांच्या जागी सिद्धीनाथ गुप्ता यांची नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती केली आहे.