Ahilyanagar : अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’वरून तणाव; रस्त्यावर रांगोळी काढल्याने मुस्लिम समाज संतप्त; दगडफेकीनंतर लाठीचार्ज
अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले.