डंकी रूटने लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी डंकी रूटने लोकांना बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत पाठवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली. आरोपी गगनदीप सिंग उर्फ गोल्डी हा पश्चिम दिल्लीतील तिलक नगरचा रहिवासी आहे. आरोपीने पंजाबमधील एका माणसाला बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवले होते, ज्याला या महिन्याच्या सुरुवातीला भारतात परत पाठवण्यात आले.