Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप
बुधवारी गाझा येथील खान युनूस येथील अन्न वितरण केंद्रात ४३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ जणांचा अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. तर १५ जणांचा चेंगराचेंगरीत चिरडून मृत्यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही घटना गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) केंद्रात घडली. मंत्रालयाने इस्रायली सैन्य आणि अमेरिकेवर “जाणूनबुजून” भुकेल्या लोकांची कत्तल केल्याचा आरोप केला.