Pralay Missile Salvo : एका लाँचरमधून सलग 2 प्रलय क्षेपणास्त्रे डागली; भारताची यशस्वी चाचणी; 7500 किमी प्रति तास वेग
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यावेळी एकाच लाँचरमधून खूप कमी वेळेच्या अंतराने दोन प्रलय क्षेपणास्त्रे (सल्वो लॉन्च) डागण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी सकाळी सुमारे 10:30 वाजता करण्यात आली.