Assam Voter : आसाममध्ये 10.56 लाख मतदारांची नावे वगळली, यात 93 हजार संशयास्पद मतदार समाविष्ट नाहीत; 6 महिन्यांत विधानसभा निवडणुका
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुमारे सहा महिने आधी मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन (स्पेशल रिव्हिजन) करण्यात आले आहे. यात 10,56,291 लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने आसाममध्ये मतदार यादी पडताळणी प्रक्रिया ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ ऐवजी ‘स्पेशल रिव्हिजन’ या नावाने केली होती.