Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला
कर्नाटक पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांच्या गूढ परिस्थितीत मृत्यूचा तपास सुरू केला आहे. शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत ते मृतावस्थेत आढळले. ७० वर्षीय अयप्पन हे कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ होते आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICMR) अध्यक्ष असलेले पहिले बिगर-पीक शास्त्रज्ञ होते.