RSS : सरसंघचालक म्हणाले- RSS सारखी संघटना फक्त नागपूरमध्येच निर्माण होऊ शकते; शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना स्वतःसाठी नाही तर देव, धर्म आणि राष्ट्रासाठी केली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशातील अनेक लोकांना हिंदुत्वाचा अभिमान होता आणि त्यांनी हिंदू एकतेबद्दल बोलले, परंतु आरएसएससारखी संघटना फक्त नागपुरातच निर्माण होऊ शकली. त्याग आणि समाजसेवेची भावना येथे आधीच अस्तित्वात होती.”