डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची महाआरती; कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती!!
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिकच्या काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची आरती करण्यात येणार असून या आरतीद्वारे सामाजिक समता बंधुता समरसता आणि एकात्मतेचा दीप उजळण्याचा अनोखा उपक्रम रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुलोम ही संस्था करणार आहे.