Supreme Court : सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी- कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास मोठा दंड ठोठावू, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारेही जबाबदार
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कठोर टिप्पणी केली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची प्रत्येक घटना आणि त्यामुळे होणारा प्रत्येक मृत्यू रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, तर त्यांच्यावर मोठा मोबदला किंवा दंड आकारला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केवळ सरकारच नाही, तर जे लोक (डॉग फीडर्स) सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतात त्यांनाही जबाबदार धरले जाऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.