White Collar Terror : व्हाइट कॉलर टेरर मोड्युलने दिल्ली हादरवण्याचा कट; 3 डॉक्टरांच्या अटकेनंतर अल-फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात
दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमधील धौज आणि फतेहपूर टागा भागात दोन घरांमधून २,९०० किलोग्रॅम स्फोटके सापडल्याच्या गुढतेचा उलगडा होऊ लागला आहे. हा संपूर्ण कट “व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल” चा भाग आहे, जे या प्रकरणात डॉक्टरांसारख्या समाजातील व्यक्तींचा वापर करते.