काँग्रेसने लढविली आयडियेची कल्पना; तामिळनाडूतल्याच द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याच्या हाती बांधला पराभवाचा गंडा!!
जगदीप धनखड यांच्या बरोबर “राजकारण” खेळून त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालविण्याचा “पराक्रम” करणाऱ्या काँग्रेसने आता पुढचा “डाव” टाकला असून ओढवून घेतलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून उमेदवार देण्यापेक्षा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याला उमेदवार बनवून त्याच्या हाती पराभवाचा बांधायचा घाट घातल्याची राजकीय वस्तुस्थिती समोर आली.