DK Shivakumar : भाजपची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याविरोधात टीका; राजीनाम्याची मागणी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या बंगळुरूतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत केलेल्या विधानावर भाजपने गंभीर टीका केली आहे. शिवकुमार यांनी २० फेब्रुवारी रोजी एका कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी म्हटले होते की, “आगामी २-३ वर्षांत देवही बंगळुरूच्या वाहतूक व्यवस्थेला सुधारू शकत नाही.” या विधानावर भाजपने त्यांची कडवट टीका केली आहे.