ठाण्यात दिवाळी मिलनाचे निमित्त आणि विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका; शिंदे सेनेच्या स्वबळाचा इतरांना तडाखा!!
ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.