CM Fadnavis : महाराष्ट्र सरकारतर्फे दिव्या देशमुखचा सन्मान करू; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फायनलमध्ये दोन्ही खेळाडू भारतीय असल्याचा अभिमान
नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे विजेतेपद पटकावले. विश्वविजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.