Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी सुरू; आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर अनेकांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.