South Korea Rain : दक्षिण कोरियात पावसाचा कहर, पूर-भूस्खलनात 14 ठार; 12 बेपत्ता, रस्ते-इमारती पाण्याखाली
दक्षिण कोरियामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. दक्षिण कोरियातील गॅप्योंग शहरात भूस्खलनामुळे बाधित झालेले लोक मदत छावण्यांमध्ये पोहोचत आहेत.