Dino Morea : मिठी नदी भ्रष्टाचार प्रकरणात EDने बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स
मिठी नदीच्या स्वच्छतेतील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. ईडीने पाठवलेल्या वेळेत, त्याला पुढील आठवड्यात चौकशीसाठी येण्यास सांगितले आहे. शुक्रवारी ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा टाकला.