Bhojpuri Actor : भोजपुरी अभिनेत्याचे ठाकरेंना आव्हान- मी मराठी बोलत नाही, भोजपुरी बोलतो; धमक असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा
मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा, अशा शब्दात आव्हान दिले होते. परंतु केडियाने आता माघार घेतली आहे. परंतु, आता दिनेश लाल यादव यांनी केलेल्या आव्हानामुळे नवीन वाद सुरू होणार आहे.