Belgian Court : फरार मेहुल चोक्सीला भारतात परत पाठवण्यास मंजुरी; बेल्जियम न्यायालयाचा निकाल
बेल्जियमच्या अँटवर्प शहरातील न्यायालयाने शुक्रवारी फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यायालयाने भारतीय एजन्सींच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीची केलेली अटक कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.