Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्री म्हणाले- औरंगजेबाला महान म्हणणे देशाचे दुर्दैव; ‘बागेश्वर बाबा’ अकाउंटवरून शेअर केला औरंगजेबाला बुटाने मारल्याचा फोटो
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री ५ दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. ते गोपाळगंजमध्ये हनुमान कथा सांगतील. उत्तर प्रदेशातील कुशीनगरहून गोपाळगंजला येत असताना त्यांनी औरंगजेब वादावर विधान केले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, महाराणा प्रताप आणि राणी लक्ष्मीबाई सारखे महान योद्धे असूनही औरंगजेबाचा गौरव केला जातो हे या देशाचे दुर्दैव आहे.’