Dhananjaya Munde : सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, धनंजय मुंडे यांचा विश्वास
माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल, ते मी सहन केले. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.