Dhananjay Munde’ : बंजारा-वंजारी एकच, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून वाद, हरिभाऊ राठोड यांनीही मांडली भूमिका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंजारा व बंजारा एकच असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हणत हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.