Bangladesh : हादीचे मारेकरी मेघालय सीमेवरून भारतात पळून गेले, बांगलादेश पोलिसांचा दावा भारताने फेटाळला
भारत आणि शेख हसीना यांच्या विरोधात असलेले बांगलादेशी राजकारणी उस्मान हादी यांच्या हत्येतील दोन प्रमुख संशयित भारतात लपले असण्याची शक्यता आहे. बांगलादेशी मीडिया आउटलेट द डेली स्टारनुसार, हादीचे मारेकरी मेघालय सीमेवरून भारतात पळून गेले. ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (डीएमपी) डेली स्टारला ही माहिती दिली.