राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी; सर्व एक्सप्रेस वे आणि न्यू टाऊनच्या कामाला गती!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली.