महिलांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, महिलांनी तक्रार दाखल करण्यात पुढाकार घेतल्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे.