Devendra Fadnavis : लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील आता व्हॉट्सअपवर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे रविवारी परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.