Devendra Fadnavis : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी, प्रतिब्रास 200 रुपये सवलत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे.