Devendra Fadnavis : स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना पहिली तीन वर्षे प्रीमियमवर कोणतेही व्याज नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटप कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.