नागपूरच्या हिंदूंच्या घरांवर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.