Maharashtra Govt : मराठा आंदोलनातील मृत वारसांना MIDC मध्ये नोकरी:राज्य सरकारचा शासन निर्णय जारी, जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून पुन्हा महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयडीसी आणि विविध सरकारी संस्थांमधील रोजगार संधींमध्ये मराठा समाजातील युवकांना प्राधान्य देण्यासंदर्भात सरकारकडून काही प्रशासकीय निर्णयांची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.