Eknath Shinde : मराठा आंदोलनाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदे म्हणाले – आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, विकास महत्त्वाचा
राज्यातील राजकारणात सध्या ‘देवाभाऊ’ या नावाने एक नवीन जाहिरात मोहीम सुरू झाली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळल्याबद्दल श्रेय दिले जात आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढल्याबद्दल मुंबईत विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना दिसत आहेत आणि ‘देवाभाऊ’ असे लिहिले आहे. या मोहिमेमागे कोण आहे, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी, राजकीय वर्तुळात ही मोहीम मराठा आरक्षणाशी जोडली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.