Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गाड्या वचा वेग कमी झालेला नाही. एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला असून, मागील पाच तिमाहीतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.