• Download App
    DesignBoxed | The Focus India

    DesignBoxed

    Naresh Arora : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलिसांची धाड; पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केली भूमिका; तपासात आक्षेपार्ह आढळले नाही- पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.

    Read more