Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी; NCP नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.