Trump : ट्रम्प यांचे स्थलांतरितांकडे 2 पर्याय- मायदेशी परता, मुलांपासून वेगळे होण्याची तयारी ठेवा
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत स्थलांतरितांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरूच आहे. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांवर दबाव आणण्यासाठी एक नवीन रणनीती स्वीकारली. त्यात आश्रय मागणाऱ्या पालकांना दोन पर्याय दिले जातात. – हद्दपारीचा आदेश स्वीकारणे किंवा त्यांच्या मुलांपासून वेगळे होणे. हे धोरण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील कुप्रसिद्ध ‘कुटुंब वेगळे करणे’ धोरणाची एक नवीन आवृत्ती मानली जाते. आता नवीन रणनीतीमध्ये आधीच अमेरिकेत दाखल झालेल्या स्थलांतरितांना लक्ष्य केले जाते. हा समुदाय हद्दपारीच्या आदेशांना तोंड देत आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने सरकारी कागदपत्रे आणि केस फाइल्सच्या आधारे ९ कुटुंबे शोधली. ती ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाचे बळी ठरली आहेत. अधिकाऱ्यांनुसार पालकांकडे संपूर्ण कुटुंबासह देश सोडण्याचा किंवा वेगळे होण्यास स्वीकारण्याचा पर्याय आहे. तीन कुटुंबांच्या कथेतून किती तणाव वाढणार आहे ते जाणून घ्या.