Greenland Annexation : अमेरिकेत ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे विधेयक सादर; 51वे राज्य बनवणार, 300 वर्षांपासून हा डेन्मार्कचा भाग
अमेरिकेचे खासदार रँडी फाइन यांनी सोमवारी ‘ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट’ नावाचे विधेयक सादर केले आहे. या विधेयकाचा उद्देश अमेरिकन सरकारला ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा आणि नंतर त्याला अमेरिकेचे राज्य बनवण्यासाठी कायदेशीर अधिकार देणे हा आहे.