Delhi : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकलेले
दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शुक्रवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात १० हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.