Delhi Police : दिल्ली पोलिसांना मोठे यश, २०१९ च्या हिंसाचारातील आरोपीस अटक
२०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान आग्नेय दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ (४२) हा शाहीन बागचा रहिवासी आहे. तो न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्याला गुन्हेगार घोषित करण्यात आले.