Delhi-NCR : दिल्ली-NCR मध्ये एका वर्षासाठी फटाके वाजवण्यास बंदी; सुप्रीम कोर्टाने म्हटले- प्रत्येकजण एअर प्युरिफायर बसवू शकत नाही
दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका वर्षाने वाढवली. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपीठाने सांगितले की, वायू प्रदूषणाची पातळी बऱ्याच काळापासून धोकादायक राहिली आहे.