Amit shah : अमित शहा- धनंजय मुंडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; मुंडेंना मंत्री केले तर फडणवीसांना माफ करणार नाही- अंजली दमानिया
महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.