Delhi march : शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चा पुढे ढकलला; 19 मार्चपर्यंतची मुदत, एमएसपी डेटा पडताळणीवर चर्चा रखडली
हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. यावेळी शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये असा इशारा दिला आहे. त्यांना योग्य मोबदला द्या. सध्या आमचे लक्ष केंद्राकडे आहे. जर कोणत्याही जिल्ह्यात जबरदस्तीने जमीन संपादित केली गेली तर आम्ही पंजाब सरकारचे जगणे कठीण करू.