Delhi liquor : दिल्लीत मद्य धोरणात बदलामुळे दोन हजार कोटींपेक्षाही झाले जास्त नुकसान
दिल्ली विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मद्य धोरणाशी संबंधित कॅग अहवाल सादर केला. १४ कॅग अहवालांपैकी पहिला कॅग अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला आहे. कॅगच्या अहवालात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या अहवालानुसार, आम आदमी पक्षाच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे दिल्ली सरकारला सुमारे २,००२.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.