Delayed Monsoon : देशात शेती असलेल्या भागात दुष्काळाचे सावट; निम्म्या भारतात तुटीच्या पावसाने खरीप पेरण्या 21% पिछाडीवर, महाराष्ट्रावरही चिंतेचे ढग
जूनमधील संथ सुरुवातीनंतर मान्सून जुलैमध्ये वेगाने सावरला. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील पावसाची तूट ४० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आली आहे. असे असूनही पावसाचे असमान वितरण खरीप पेरण्यांसाठी धोक्याचे बनले आहे. हवामान विभागाच्या देखरेखीखालील ७३८ पैकी ३७७ जिल्ह्यांत सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला. यातील १०० जिल्ह्यांमधील शेती पूर्ण पावसावर अवलंबून आहे. अशा स्थितीत खरिपाच्या पेरण्या गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी पिछाडीवर आहेत.