Rajnath Singh : टॅरिफ वादावर राजनाथ म्हणाले- कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, कायमस्वरूपी हितसंबंध असतात
अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, कोणताही देश कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. फक्त कायमचे हित असते. शनिवारी एनडीटीव्ही संरक्षण शिखर परिषदेत राजनाथ सिंह यांनी हे विधान केले.