पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाच्या राजकारणावर परिणाम होऊ पाहणारा एक मोठा करार झाला आहे. पाकिस्तान आणि सौदी अरबने सैन्य करार केला आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त स्पष्टीकरणानुसार, आता दोन्ही देश कोणत्याही आक्रमकतेविरुद्ध सोबत मिळून काम करतील. दोन्हीपैकी एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. या सैन्य करारावर प्रतिक्रिया देताना गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले की, आम्हाला याची माहिती आधीपासून होती. आम्ही प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून या सैन्य कराराचे आकलन करत आहोत. ते म्हणाले, भारत स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.