Deepak Kesarkar : देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबईत पार पडलेल्या विजयी रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘अणाजी पंत’ असा करत टोला लगावला. यावर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणे म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अपमान असल्याचे केसरकर यांनी म्हटले.