RBI : व्याजदरात 0.50% कपातीची शक्यता; महागाई घटल्याने निर्णयाचा अंदाज, RBIची डिसेंबरमध्ये बैठक
येत्या काही महिन्यांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो दरात ०.२५-०.५% कपात करण्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. अन्नधान्याच्या किमतीत घट आणि अलीकडील जीएसटी कपातीच्या परिणामामुळे महागाई मध्यम राहिली आहे. यामुळे आरबीआयला आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यासाठी चलनविषयक धोरण सुलभ करण्याची संधी मिळेल, असे कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे.