Maharashtra : राज्यात अतिवृष्टीचा कहर; मुंबई, मराठवाड्यासह विदर्भात 12 ठार; अनेक गावांचा संपर्क तुटला
राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत गत दोन दिवस अतिवृष्टी झाली, तर मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाने हाहाकार माजवला. कोकण विभागात गत चार दिवसांपासून आणि विदर्भातही गत २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला.