Prof Chhokar : ADRचे संस्थापक प्रो. छोकर यांचे निधन; निवडणूक रोखे रद्द करण्यासारख्या 6 मोठ्या सुधारणा केल्या
निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) चे सह-संस्थापक आणि निवडणूक सुधारणांचे कट्टर समर्थक असलेले प्रो. जगदीप एस. छोकर यांचे शुक्रवारी सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. प्रो. छोकर यांच्या इच्छेनुसार, त्यांचे शरीर संशोधनासाठी लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले आहे.